राणे आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार ?

Wednesday, November 21, 2018





कणकवली (प्रतिनिधी)ः कोकणातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोबत घेण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची मदत घेऊन निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. 
 
मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली होती. याआधीही काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सिंधुदुर्गची जागा सोडण्याची मागणी केली होती. सिंधुदुर्गमध्ये आमच्याकडे मोठा उमेदवार आहे असे राष्ट्रवादीने जाहीर केले होते. सिंधुदुर्गात मोठा उमेदवार दुसरे तिसरे कोणी नसून नारायण राणे हेच असल्याचे सांगण्यात आले. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. त्यातील रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे निवडणूक लढवणारआहेत. मागच्या निवडणुकीत त्यांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला होता.
राणे आणि तटकरे या दोघांना एकमेकांची मदत लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासोबत युती करू शकते. काँग्रेसवर प्रचंड टीक करून बाहेर पडलेल्या राणे यांच्यासाठी ती जागा काँग्रेस सोडणार का, हा खरा प्रश्‍न आहे. काँग्रेसने याबद्दल अजून होकार कळवलेला नाही. राणे यांनी आघाडीसोबत युती केली तर राणे सोबत राहतील का, असा प्रश्‍न काँग्रेसला पडला आहे. कारण त्यांनी मनाप्रमाणे काही मिळाले नाही, की लगेच दबाव आणीत पक्षत्याग केला आहे. राणे यांनी याबद्दल अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर होते; परंतु भाजपनेही त्यांची अडवणूक केली. विधान परिषद सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतरही निवडून येण्याची खात्री असताना भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. शिवसेनेचा बागुलबुवा उभा करून त्यांना खेळवत ठेवले. भाजपत त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापन केली. त्यानंतर भाजपकडूनच नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता ते भाजपचे खासदार आहेत. असे असताना आता ते लोकसभेसाठी तयार होतील का, हा ही प्रआता ते भाजपचे खासदार आहेत. असे असताना आता ते लोकसभेसाठी तयार होतील का, हा ही प्रश्‍न आहेच.











No comments:

Post a Comment