माधवराव पाटील कौळखेडकर यांचे निधन

Friday, November 9, 2018

उदगीर :माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे व्याही आणि लाईफ केअर हॉस्पिटलच्या अध्यक्षा सौ .अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे वडील माधवराव पाटील कौळखेडकर यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

 माधवराव पाटील कौळखेडकर हे  उदगीर येथील नामांकित शिक्षण संस्था भारत लिबरल  एज्युकेशन सोसायटीचे 1962 पासून 2016 पर्यंत अध्यक्ष होते .नामांकित वकील म्हणून त्यांची ख्याती होती .उदगीर वकील संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते .काँग्रेसचे एकनिष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. 

शुक्रवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले .शनिवारी दुपारी १२ .३० वाजता कौळखेड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .कौळखेडकर यांच्या निधनाबद्दल मान्यवर नेते ,कॉंग्रेसचे पदाधिकारी व  नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे .
कौळखेडकर परिवाराच्या दुःखात मराठवाडा नेता सहभागी आहे

No comments:

Post a Comment