शिवशरणप्पा चितकोटे यांचे निधन

Sunday, November 11, 2018

लातूर , दि . ११ : लातूर येथील वीरशैव समाजातील ज्येष्ठ नेतृत्व , महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवशरणप्पा चितकोटे यांचे रविवारी ( ११ ) सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९८ वर्षे होते. 

स्व. शिवशरणप्पा चितकोटे यांचा विविध सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता. लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य अशा महात्मा बसवेश्वर  शिक्षण संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
 त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता वीरशैव लिंगायत बेलपत्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली , सुना, नातू - पणतू असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment