धनवृद्धीसाठी या मुहुर्तावर करा लक्ष्मी पूजन

Tuesday, November 6, 2018

लातूर: रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण लक्ष्मीच्या मागे धावत असतो .पैसा कमावण्यासाठी उद्योगधंदे ,व्यापार आणि नोकऱ्या करतो. लक्ष्मी अर्थात धनलक्ष्मी आपल्याकडे यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शिवाय आलेली लक्ष्मी कायम रहावी ,स्थिर रहावी  असेही आपल्याला वाटते . लक्ष्मी स्थिर रहावी यासाठीच आपण लक्ष्मी पूजन करतो. अश्विन अमावस्या अर्थात दीपावली मध्ये येणाऱ्या अमावस्येला  हे लक्ष्मीपूजन केले जाते .

उद्या बुधवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अमावस्या आहे .या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने लक्ष्मीपूजन करता येते .परंतु त्यातही विशेष मुहूर्तावर पूजा करावी अशी सर्वांची भावना असते. पंचांगकर्त्यांनी यासाठी विशेष मुहूर्त दिलेले आहेत.

 दिवेलागणीच्या वेळेला अर्थात प्रदोष काळावर केलेली लक्ष्मीची पूजा सर्वात उत्तम मानली जाते .या वेळेत दीपलक्ष्मी आणि धनलक्ष्मीची  एकत्रित पूजा केली जाते. शिवाय या कालावधीत ६वाजुन  २२ मिनिटे ते ८ वाजुन २२ मिनिटे दरम्यान वृषभ लग्न आहे .हे स्थिर  लग्न  असल्यामुळे या मुहूर्तावर केलेली पूजा लाभदायक ठरते. 

अमावस्येला अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बुधवार आहे .यामुळे होरा कोष्टकानुसार पंचांगकर्त्यांनी विविध मुहूर्त दिलेले आहेत.  द्रव्य संग्रहासाठी शनिचा होरा उपयुक्त ठरतो .बुधवारी  दुपारी ३.४३  ते ४ .४३ आणि रात्री १० .४३ ते ११ .४३ या कालावधीत शनिचा होरा आहे. त्यामुळे या मुहूर्तावरही पूजा करता येऊ शकते .शनि सोबतच चंद्राचा होरा लक्ष्मीची पूजा करण्यासाठी उपयुक्त असतो .चंद्राचा होरा सर्व कार्यासाठी उपयुक्त मानला जातो .यामुळे या मुहूर्तावर केलेले लक्ष्मीपूजन फायद्याचे ठरते .बुधवारी दुपारी २ .४३ ते ३ .४३  आणि रात्री ९ .४३ ते १० . ४३ या कालावधीत चंद्राचा होरा आहे .त्यामुळे या कालावधीत केली लक्ष्मीची पूजा फायदेशीर ठरते . लग्न आणि विशिष्ट ग्रहाचा होरा याचा विचार करून पंचांगकर्त्यांनी हे मुहूर्त दिलेले आहेत .त्यामुळे आपल्याकडे येणारी लक्ष्मी स्थिर रहावी  यासाठी या मुहूर्तावर पूजा करावी असे पंचांगकर्त्यांनी सुचविले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment