पुणे: लातूर येथे उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पासाठी आवश्यक असणारे पूरक उद्योग गतीने सुरू करावेत, उद्योजकांनी यात गुंतवणूक करावी असे आवाहन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
पुणे येथे एम सी सी आय ए, रेल्वे आणि मेट्रो यासंदर्भात नुकतीच एक महापरिषद संपन्न झाली .या परिषदेत रेल्वेमंत्री गोयल बोलत होते. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची या परिषदेस उपस्थिती होती.
रेल्वेमंत्री गोयल म्हणाले की महाराष्ट्र रेल्वे निर्मितीचे हब बनविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे .रेल्वेमंत्री पियुष गोयल ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून लातूर येथे रेल्वे बोगी प्रकल्प मंजूर झाला आहे .नवरात्रात या प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे .जमीन हस्तांतरणाचे कार्य जवळजवळ पूर्ण झाले असून प्रकल्पस्थळी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कायमस्वरूपी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी रेडीमेड भिंतींचा वापर केला जात आहे. लातूर व महाराष्ट्र रेल्वेचे हब बनावे ,या परिसरात पूरक उद्योग यावेत ,हजारो युवकांना रोजगार मिळावा या बाबींकडे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे बारकाईने लक्ष आहे .
पुणे येथे झालेल्या परिषदेत पालकमंत्र्यांच्या या दृष्टिकोनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. एका बाजूला स्वतःचे उद्योग सुरु करण्याची प्रवृत्ती वाढत असताना रोजगार निर्मिती व्हावी, लातूरचे नाव देशात व्हावे या दृष्टीने गतीने कामे केली जात आहेत .खऱ्या अर्थाने जनतेला अच्छे दिन दाखवण्यासाठी विविध योजनांचे पैसे थेट खात्यात जमा केले जात आहेत .पिक विमा तसेच विविध शासकीय योजना ,घरकुल, ट्रॅक्टर ,कांदा चाळ यासह स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जे कधीही घडले नाही ते घडविण्याचे काम सुरू आहे .लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे .हे अच्छे दिन नव्हेत काय ?
गाव धूरमुक्त करण्यासाठी गॅसचे वाटप केले जात आहे. कुठल्याही शासकीय कामासाठी चिरीमिरी द्यावी लागत नाही.
लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. अनेक अडथळ्यातून वाट काढत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत .रेल्वे बोगी कारखान्याच्या माध्यमातून राज्याला व जिल्ह्याला रेल्वे हब बनविण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.हे नव्हेत का अच्छे दिन ? आठ वर्ष मुख्यमंत्री ,अनेक वर्ष मंत्रीपदी राहूनही बाहेरचा एकही प्रकल्प लातूरसाठी आला नाही .परंतु आज असे प्रकल्प येत आहेत. हे अच्छे दिन नव्हेत काय ? अशा प्रतिक्रिया सामान्य जनता आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त करीत आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:
Post a Comment