लातूर / प्रतिनिधी – शाळेचा पहिला दिवस ... गावात हालगीचा नाद घुमू लागला. त्यापाठोपाठ बैलगाडीतून मिरवणूक निघाली
.पण ही मिरवणुक कोण्या राजकीय नेत्याची नव्हती तर पहिल्याच दिवशी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत शाळेत नेण्यात येत होते. या विद्यार्थ्यां च्या स्वागताला साक्षात जिल्हा् परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रामचंद्र तिरुके जातीने हजर होते. चार तालुक्या्तील ११ गावांमध्ये प्रवेशोत्सवाचा हा सोहळा संपन्न झाला. त्या्मुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाणा-या विद्यार्थ्यां चा दिवस आनंदी ठरला.
जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती या नात्याने रामचंद्र तिरुके यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी किमान ११ शाळांना भेटी देण्याचा संकल्प् केला होता, तो संकल्प शुक्रवारी पुर्णत्वास आला. पहिल्याच दिवशी शाळेत जाणारे विद्यार्थी हिरमुसलेले असतात, पण शुक्रवारी दिसलेले चित्र काही वेगळेच होते. प्रत्येक विद्यार्थी आनंदात दिसत होता. गणवेश घालून पाठीवर दप्तर अडकवलेले विद्यार्थी घराच्या दारात उभे होते. त्यावेळी सजवलेली बैलगाडी त्यांच्या दारात आली. या विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवण्यात आले आणि हालगीच्यां गजरात बैलगाडीतून मिरवणुकीद्वारे हे विद्यार्थी हरंगुळ येथील नव्या वसाहतीत असणा-या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचले. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले. शाळेत प्रवेश घेताच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांचे तोंड गोड करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकेही देण्यात आली, तसेच शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी शुक्रवारी ४ तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. लातूरच्या शासकीय वसाहतीतील जि.प.कन्या प्रशाला व प्राथमिक शाळा, हरंगुळच्या नव्या वसाहतीतील प्रा.शाळा, चाकुर तालुक्यातील आटोळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळा, बोळेगाव येथील जि.प.शाळा आणि धामनगावच्या प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील कारेवाडी, सुमठाणा, तसेच उदगीर तालुक्यातील सताळा व डिगोळ येथील प्राथमिक शाळांमध्येही तिरुके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन विद्यार्थी व पालकासह शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. शाळा सुरु होताना उपाध्यक्ष तिरुके यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व साधन व्यहक्तींना एक पत्र लिहीले होते, त्याच अनुषंगाने पहिल्याच दिवशी शिक्षक, विद्यार्थी व पालकासोबत संवाद साधून जिल्हा परिषद शाळांचा गुणवत्तेचा आलेख आणखी वर नेण्या्साठी प्रयत्ना करण्याचे आवाहन त्यांनी केले. जि.प.शाळेत मिळणा-या गुणवत्तापुर्ण शिक्षणामुळे यावषी जि.प.शाळांचा पट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे साहजिकच शिक्षकांचीही जबाबदारी वाढली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टिने अधिक विकसीत होतील असा विश्वास पालकांना देवून या माध्यमातून गुणवत्तेचे नवे पर्व सुरु व्हावे, लातूर जिल्ह्यात जि.प.शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण व्हा्वा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चाकूर तालुक्यातील धामनगाव, बोळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यान्ह भोजनाचा आस्वाद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी घेतला. विद्यार्थ्यांमध्ये मिळून-मिसळून गप्पा मारत असतानाच शाळांमधून दिल्या जाणा-या माध्यान्ह भोजनाची गुणवत्तां त्यांनी अचानक तपासली. उपाध्यक्ष आपल्यासोबत खिचडी खात असल्याचे पाहुन विद्यार्थीही आनंदुन गेले.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जि.प.चे प्रभारी मुख्यं कार्यकारी अधिकारी सुधीर भातलवंडे, जि.प.च्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नजरोद्दीन शेख, लातूर पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, धनंजय पोतदार ,धनराज गित्ते , पं.स.सदस्य अरविंद सुरकुटे, महेश व्हत्ते ,त्या त्या गाव चे सरपंच, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

No comments:
Post a Comment