लातूर/प्रतिनिधी : शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असलेल्या राज्य सरकारने शेतकर्यांच्या उन्नतीसाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून शेतकर्यांना पंतप्रधान पिकविमा योजना जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी शासन बांधिल आहे. त्या अनुषंगानेच लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांना २०१७ च्या खरिप पिकासाठी आणखीन २१.७५ कोटींचा पिकविमा मंजूर झालेला आहे. यापूर्वी २३८ कोटी रूपयांच्या पिकविम्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर २०१७ च्या रब्बीसाठी ८९ कोटी रूपयांचा विमा प्राप्त झालेला असून या दोन्ही विम्यांची रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्यांना करण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेले आहेत.
शेतकर्यांच्या हितासह प्रगतीकरीता बांधील असलेल्या केंद्र व राज्य सरकारने विविध माध्यमातून बळीराजाला मदतीचा हात पुढे केलेला आहे. या मदतीमध्ये प्रामुख्याने पंतप्रधान पिकविमा योजना अंतर्गत रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लातूर जिल्ह्यालाही पालकमंत्री निलंगेकर यांच्या पुढाकारातून खरीप व रब्बी पिकासाठी जास्तीत जास्त पिकविमा कसा मिळेल याकरीता पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना २०१७ च्या खरिपासाठी यापूर्वी २३८ कोटी रूपयांचा पिकविमा वाटप करण्यात आलेला आहे. मात्र या विम्यापासून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांनाही याचा लाभ मिळावा याकरीता पालकमंत्री निलंगेकर यांनी शासन व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून विम्याची रक्कम शेतकर्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या प्रयत्नातूनच खरिप पिकविम्यासाठी आणखीन २१.७५ कोटी रूपये प्राप्त झालेले आहेत. यापूर्वी व आता मिळालेली पिकविम्याची रक्कम एकंदरीत २४९.७५ कोटी रूपये झालेली आहे.
खरिपाच्या पिकविम्यासोबतच २०१७ सालच्या रब्बी पिकासाठी ८९ कोटी रूपये पिक विम्याची रक्कम प्राप्त झालेली आहे. या दोन्हीही पिकविम्याची रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्यांना वाटप करण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेले आहेत. आगामी काळातही शेतकर्यांच्या हितासह प्रगतीकरीता शासन बांधील असेल अशी ग्वाही या निमित्ताने पालकमंत्री निलंगेकरांनी दिलेली आहे. सदर पिकविम्याची रक्कम मंजूर झाल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकर्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त केलेले आहेत
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment