वसंतराव नागदे यांचा लवकरच अमृत महोत्सव

Tuesday, October 30, 2018


उस्मानाबाद :येथील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे नेते तसेच कायम सत्संगात रमणारे ,वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व वसंतराव नागदे यांचा अमृत महोत्सव लवकरच होणार आहे . यासाठी आगामी दोन दिवसात स्वागताध्यक्ष निवड होणार असून विविध समित्या गठीत करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे 

नागदे यांनी खऱ्या अर्थाने सत्संग केला आहे .वारकरी संप्रदायाचे कार्य केले असून उस्मानाबाद येथे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर उभे केले आहे . कष्टकरी, गोरगरीब, श्रमिक आणि अठरा पगड जातीच्या लोकांच्या जीवनातील उन्हाळा व ग्रीष्म ऋतू संपवून त्यांच्या जीवनात वसंत ऋतु यावा, अशा लोकांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे हे कृतीतून सिद्ध करणारे वसंतराव नागदे यांचे व्यक्तिमत्त्व आहे .सुभाष दादा गोविंदपूरकर ,सेठ ब्रिजलाल मोदाणी , वैजनाथ दादा शिंदे ,माने ,भोसले, काळे असे अठरापगड जातीचे मित्र नागदे यांच्याकडे आहेत .

केवळ उस्मानाबाद जिल्हा नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आपल्या कार्यातून त्यांनी सहकार जिवंत ठेवण्याचे काम केले. सहकार हा कष्टकरी, श्रमिकांसाठी असतो हे दाखवून दिले .एक चांगले व्यवस्थापक म्हणून मशायक यांचा जवळचा संबंध आहे तसेच वारद मॅडम व सर्व कर्मचाऱ्यांना आपुलकी, जिव्हाळा तसेच समतेच्या दृष्टिकोनातून वागणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. लाखो लोकांच्या जीवन तसेच उद्योग उभारणीत त्यांनी हातभार लावला आहे . महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातही त्यांचे कार्य आहे .यामुळेच वसंतराव नागदे यांच्या अमृतमहोत्सवाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक संत - महंत व राजकीय मंडळींच्या जडणघडणीतही नागदे यांचे कार्य झालेले असून यामुळेच त्यांचा अमृत महोत्सव भव्य -दिव्य होणार याची सर्वांनाच खात्री आहे.

No comments:

Post a Comment