चाकूरकर यांचे हैदराबाद येथे स्वागत

Tuesday, October 30, 2018

हैदराबाद :तिरुपती दर्शनासाठी रवाना झालेले माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे हैदराबाद येथे जोरदार स्वागत करण्यात आले. विविध वृत्तवाहिन्यांनी चाकूरकर यांच्या स्वागताची दखल घेतली. चाकूरकर यांच्या समवेत माजी मंत्री आ. बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष तथा लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप राठी, चाकूरकर यांचे सुपुत्र शैलेश पाटील यांचा हैदराबाद येथे सत्कार करण्यात आला .अनेक वृत्तवाहिन्यांवर हा सत्काराचा कार्यक्रम दाखवण्यात आला .


चाकूरकर यांनी सत्संगात राहतानाच राजकारणात पन्नास वर्ष काम केले .सध्याच्या राजकारणातील एक दूरदृष्टी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते .अध्यात्म ,विज्ञान व पर्यावरण यांची एकत्रित सांगड घालणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून चाकूरकर यांचा सर्वत्र परिचय आहे.


येणाऱ्या बुधवारी चाकूरकर यांचे उस्मानाबाद येथे व्याख्यान होणार आहे .स्वातंत्र्योत्तर भारत व इंदिरापर्व असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. चाकूरकर यांचे नेतृत्व राजकीय क्षेत्रात सतत रहावे यासाठी अनेकांचा प्रयत्न आहे. कदाचित उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात चाकूरकर यांच्या उमेदवारीची ही नांदी ठरू शकते .चाकूरकर यांचे कुणाशीही वैर नाही, त्यांनी कोणताही घोटाळा केला नाही .एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहत आहे .यामुळे तिरुपतीचे दर्शन हे त्यांच्या नव्हे तर देशासाठी येणाऱ्या काळात प्रेरणा देणारे ठरावे अशाच शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत .

No comments:

Post a Comment