लातूर लोकसभेसाठी सुशील कुमार शिंदे की डॉ . काळगे

Monday, October 29, 2018


मुंबई / प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला असून महाराष्ट्रात एक-एक जागा महत्त्वाची समजून याठिकाणी सुशिलकुमार शिंदे हे उभा राहतील अशी जोरदार चर्चा आहे. स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरलाच गेला तर नेत्ररोग तज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांच्यासाठी जिल्हाभरातून पक्षा व्यतिरिक्त काळगे यांच्या समर्थनार्थ सक्रीय होणारे दोनशे ते अडीचशे डॉक्टर या यंत्रणेत स्वतंत्रपणे सहभागी होवू शकतात. 

आमचा प्रतिनिधी कळवतो की, लातूर जिल्ह्यातील मतदार हे सातत्याने, समर्थ, अभ्यासू व योग्य उमेदवाराला साथ देणारे म्हणून परिचित आहेत. अशा परिस्थितीत लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्यावतीने सुशिलकुमार शिंदे सारखा समर्थ, अभ्यासू व देशपातळीवर नेतृत्व करण्याची धमक आणि कुवत असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण व काँग्रेस हायकमांड हे एक-एक जागा महत्त्वाची समजून उमेदवारी निश्‍चित करणार अशी चर्चा असून लातूरचं नांव महाराष्ट्रातच नाही तर देशात राजकीय नेतृत्व देणारा जिल्हा म्हणून नावलौकीक आहे. या सर्व गोष्टीचा विचार करुन काँग्रेस पक्षातर्फे सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नव्हे त्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं चर्चेत आहे. 

दरम्यान, सेवानिवृत्त आयएएस ऑफिसर भा.ई.नागराळे हे लातूर जिल्ह्यात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या नावाची चर्चा आहे पण मताचा कौल म्हणावा तेवढा त्यांच्या बाजूने मिळत नाही. कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचा लोकांशी असलेला संपर्क व त्यांचं राजकीय वखूब लक्षात घेता ते लोकांत कॅची नेतृत्व नाहीत या पार्श्‍वभूमीवर भा.ई. नागराळे यांची नावाची चर्चा आहे. दरम्यान, लातूरातील नेत्ररोग तज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांचं नेटवर्क, त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी व टीमवर्क पाहता डॉक्टर हे नेत्ररोग तज्ञच नाही तर लोकप्रिय व्यक्ती म्हणून परिचित आहेत.

 गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळेस त्यांची आणि स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांची अज्ञात ठिकाणी भेट झाली होती. नाव चर्चेत होतं पण त्यांचं मित्रमंडळ, त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी ही मात्र त्यांनी निवडणूक लढवावीच अशा प्रकारची आग्रही भूमिका घेत आहेत त्यामुळं त्यांचही नाव फायनल होऊ शकते. डॉ. काळगे शांत स्वभावाचे, मनमिळावू, लोकप्रिय व सर्वसामान्यांशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध असल्याचे बोलले जाते. नव्हे गावा-गावात त्यांच्यासंदर्भात चांगलं मत असलेले मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment