मराठा समाजाने आता जल्लोषाची तयारी करावी : मुख्यमंत्री

Thursday, November 15, 2018

अहमदनगर : 
'मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला असून त्यावर संविधानिक पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आंदोलन करू नका. १ डिसेंबर रोजी जल्लोषाची तयारी करा', असं सूचक वक्तव्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केलं. मुख्यमंत्र्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता अधिक बळावल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने जल्लोष करण्यास तयार राहावे. शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. ख-या अर्थाने वारकरी व शेतक-यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे. मात्र आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे.

शेतकरी-वारकरी संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिशिंगणापूरला आले होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं. इतरांच्या आरक्षणाला बाधा न आणता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कर्जमाफी योजना अजूनही सुरूच आहे. जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत ही कर्जमाफी योजना सुरूच राहील, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्यासाठी राज्यसरकारने तिजोरी रिकामी केल्याचंही त्यांनी सांगितलं. 


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 

Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment