शेतकऱ्यांना आता कांदा रडवणार

Wednesday, November 21, 2018

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. घाऊक बाजारात ज्या कांद्याला 1000 ते 1100 रुपये भाव मिळत होता, त्याच कांद्याला 500 ते 600 रूपये क्विंटल भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी साठवलेल्या उन्हाळी कांद्यासोबतच, आता लाल कांदाही बाजारात येतोय. 

नवीन कांद्याची आवक वाढल्यामुळे लागोपाठ भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. आधीच टोमॅटोला मिळत असलेल्या मातीमोल दरामुळे शेतकरी हवालदील झाला असून, आता शेतकऱ्यांना कांदासुद्धा रडवणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकंदर परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment