ब्रिस्बेनमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेन्टी लढतीमध्ये भारताला डकवर्थ-लुइस पद्धतीचा फटका बसला. थरारक लढतीमध्ये पाहुण्यांचा ४ धावांनी पराभव करताना यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाच्या वाटय़ाला १७ षटके आली. त्यांनी ४ बाद १५८ धावा केल्या तरी डकवर्थ-लुइस पद्धतीच्या आधारे भारतासमोर तितक्याच षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पाहुण्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवला. १७ षटकांनंतर भारताच्या ७ बाद १६९ धावा झाल्या. विजयासाठी चार धावा कमी पडल्या.

No comments:
Post a Comment