खुर्ची बळकावण्यासाठी अनेक डावपेच केले जातात. परंतु सातारचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी चक्क आपली खुर्ची सोडली. तीही एका बाल सायकलपटूच्या सत्कारासाठी. त्यांनी बाल सायकलपटूला आपल्या खुर्चीवर बसवले. त्याचा हा किस्सा. साताऱ्यातील व्यवसायिक प्रशांत पवार यांचा मुलगा अंशुल याने निपाणी ते सातारा अंतर सायकलवरून पार करण्यासाठी सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी छ. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी प्रवास सुरू केला.
दुष्काळावर मात करण्याचा संदेश देण्यासाठी त्याने सायकल प्रवासाला साताऱ्यातून सुरुवात केली. महामार्ग जवळ आल्यानंतर वेगाने जाणारी वाहने तसेच अवजड वाहनाचा वेग यामुळे चिमुकल्या अंशुलची सायकल लटपटू लागली. काही वेळेला महामार्ग सोडून त्याला दुसरीकडे सायकल वळवण्यास भाग पाडले जात होते. ही बाब त्याच्या पाठीमागून मोटरसायकलने निघालेले त्याचे वडील प्रशांत पवार यांची काळजी अधिकच वाढवू लागली. शेंद्रे घाटानजीक आपण पुन्हा घरी जाऊया आणि नंतर केव्हा तरी सायकल यात्रा काढूया, असा सल्ला वडिलांनी अंशुलला दिला.
‘छ. शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन ही मोहिम पूर्ण करण्याची शिवप्रतिज्ञा केली आहे. ती मी कदापि मोडणार नाही’, असे चिमुकल्या अंशुलने ठामपणाने सांगितले. हा निश्चय पाहून पुढील प्रवासाला गतीने सुरुवात झाली. पाच दिवसाचा प्रवास पुर्ण झाल्यानंतर त्याने सातारा नगरीत पाऊल ठेवले. ही बाब सातारच्या छ. खा. उदयनराजे भोसले यांना समजली. त्यांनी ताबडतोब अंशुल पवारला जलमंदिर या निवासस्थानी बोलावून घेतले. पुष्पगुच्छ देऊन त्याला शुभेच्छा दिल्या.
सत्कार मूर्तीचा सत्कार करताना आपण खुर्चीवर बसलो आहे आणि सत्कारमूर्ती उभी आहे, ही बाब त्यांना खटकली. त्यांनी खुर्चीवरुन उठुन अंशुलला त्या खुर्चीवर उभे केले. आणि त्याचे मनापासून स्वागत केले. छत्रपतींचे तेरावे वंशज ज्या खुर्चीवर बसतात, त्या खुर्चीला हात लावण्याचे धाडस कुणी करत नाही. त्या खुर्चीवर अंशुलला पाहून त्याचे वडील प्रशांत पवार यांचे डोळे पाणावले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, युवा नेते संग्राम बर्गे, सुनील काटकर, पैलवान नंदकुमार विभुते, विकास पवार व कोरेगाव तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment