आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
सीएम चषक अंतर्गत कळमनुरी विधानसभेत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबर रोजी डोंगरकडा येथे लावणी, समुहनृत्य, शास्त्रीय नृत्य, देशभक्तीपर गीत आदी नृत्य प्रकाराने सीएम चषक स्पर्धा चांगलीच गाजली.
या नृत्य, गायन स्पर्धेला प्रमुख उपस्थिती म्हणून गजाननराव घुगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंजि. पी.आर.देशमुख, सुरजितसिंह ठाकूर, विद्याधर मगर, निळकंठ शिंदे, मारोतराव पवार, मारोतराव देशमुख, सुनिल देशमुख, अजय पाटील, रूपेश कदम, पप्पु पवार, सचिन अडकिणे, तुषार पाटील, बबन हेंद्रे, रवि जाधव, लखन गोरे आदींची उपस्थिती होती. डोंगरकडा येथे संपन्न झालेल्या उजाला गायन व उज्वला नृत्य स्पर्धेअंतर्गत अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी मराठमोळी लावणी सादर केली. या लावणी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर समुह नृत्य, देशभक्तीपर गीते, शास्त्रीय नृत्ये या गीतावरही अनेक स्पर्धकांनी बहारदार नृत्य सादर केले. स्पर्धेतून ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून या कलाकारांना राज्यस्तरावर कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी माजी आ. गजाननराव घुगे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पंजाब अडकिणे, अक्षय पाटील, पप्पु व्यवहारे, सुरेश पोले, कैलास हेरे, सटवाजी गावंडे, प्रल्हाद देवकते, राजु जाधव, बालाजी पक्वाने, नसीब पठाण, विजय जाधव, ग्यानबा हाके, प्रविण पंडीत, सुधाकर जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद
सीएम चषक स्पर्धेअंतर्गत गुरूवारी डोंगरगाव नाका येथे कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी आ. तान्हाजीराव मुटकुळे, उद्घाटक माजी आ. गजाननराव घुगे, प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खा.शिवाजीराव माने, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजी शिंदे, पांडुरंग पाटील, संजय कावडे, राजेश लोंढे आदींची उपस्थिती होती. या कुस्ती स्पर्धेत प्रथम बक्षिस डिगंबर भुतनर, द्वितीय बक्षिस सुनिल शिंदे यांनी पटकावले. एकूण पाच बक्षिसांसह 51 हजार रूपयांच्या पारितोषीकाची या कुस्ती स्पर्धेत लय लुट करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार कळमनुरी विधानसभा युवा मोर्चा प्रभारी शिवशंकर घुगे यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment