आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
येथील हुतात्मा स्मारकाच्या जागेवर एका शैक्षणिक संस्थेने गेल्या काही वर्षापासून अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक पत्रकार संघटना व सुरेशराव वडगावकर मित्रमंडळाच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट आदेश तहसीलदारांना दिले होते.
तरीसुद्धा या शैक्षणिक संस्थेला कोण पाठींशी घालत आहे असा सवाल आंदोलकांतून उपस्थित केला जात आहे.
19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कळमुनरी तहसीलदारांना या अतिक्रमणाबाबत 22 नोव्हेंबरपर्यंत सदरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. याची एक प्रत आंदोलक म्हणून पत्रकार संघासही देण्यात आली होती. परंतू, कळमनुरी तहसीलदारांची भुमिका पाहता कायद्याला खो देत सदरील अतिक्रमण जैसे थे असून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले हुतात्मा स्मारक आजही न्यायाच्या प्रतिक्षेत उभे आहे. याबाबत यापुर्वी 22 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, असे आदेश तहसीलदारांना दिले होते. या आदेशावही तहसीलदारांनी काहीच कार्यवाही केलेली नाही.

हे अतिक्रमण हटविण्यासाठी सुरेश वडगावकर मित्र मंडळ व स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविले होते. परंतू, ईद ए मिलादुन्नबीची मिरवणुक व प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या निधनामुळे तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
सोमवारपर्यंत अतिक्रमण काढू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश-तहसीलदार
याबाबत कळमनुरी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्याशी विचारणा केली असता सदरील जागेवरील अतिक्रमण सोमवारपर्यंत काढू नका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी स्वरूपात दिले असून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन मी करीत असल्याचा खुलासा तहसीलदार वाघमारे यांनी दिला.
प्रशासनात तोंडी आदेश चालतो का-आंदोलक
याबाबत तहसीलदार वाघमारे यांनी केलेल्या खुलाशाप्रमाणे प्रशासनाच्या कामकाजात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवापर्यंत अतिक्रमण काढू नये असे दिलेले तोंडी आदेश चालतात का असा सवाल स्थानिक पत्रकार संघ व सुरेश वडगावकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित संस्थाचालकांना जिल्हाधिकाऱ्यांचा की, तहसीलदारांचा आशिर्वाद आहे, अशी चर्चा बाळापूर ग्रामस्थांत रंगली आहे.

No comments:
Post a Comment