राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाला पुर्णपणे पाठीबा आहे, असे पत्र राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टीच्या वतीने मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीला 21 नोव्हेंबर रोजी देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा मुस्लिम आरक्षणाला पाठींबा असून उच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत संमती दिली आहे. तरीसुद्धा विधीमंडळाच्या सभागृहात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संभ्रम करणारी भुमिका मांडली आहे. याचा निषेध करून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाला जाहीर पाठींबा असल्याचे पत्र मुनीर पटेल यांनी काढले असून पत्रावर जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील, शहराध्यक्ष जावेद राज,नगरसेवक खय्युम पठाण, आमेर अली, आरेफ लाला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:
Post a Comment