कयाधु नदीच्या पुनर्जीवनासाठी मुख्मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची विनंती खा.रावसाहेब दानवे यांची शिंदेेंनी घेतली भेट

Thursday, November 22, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
कयाधू नदी पुनर्जीवित करण्यासाठी भाजपा नेते रामरतन शिंदे हे सरसावले असून गेल्या वीस दिवसांपासून कयाधू नदीकाठावरील गावोगावी भेट देवून याबाबत जनजागृती सुरू केली आहे. तसेच वरिष्ठ स्तराव गाठी-भेटी घेत कयाधू नदी पुनर्जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून नुकतीच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भेट घेवून याबाबत मुख्यमंत्र्यांनी कयाधू पुनर्जीवीत करण्यासाठी कयाधू उपखोरे महाराष्ट्र शासनाच्या अजेंड्यावर घेतले पाहिजे, असा अध्यादेश काढण्याची विनंती केली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाजप नेते रामरतन शिंदे यांच्यासह नाना देशपांडे, सुभाषचंद्र लदनिया, पांडुरंग पाटील, माणिकराव पाटील भिंगीकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तब्बल तासभर झालेल्या या चर्चेत कयाधू नदी पुनर्जीवीत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. हिंगोली, सेनगाव तालुक्यातील पाणीप्रश्न, सातत्याने पडत असलेला दुष्काळ यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने कयाधू नदीपुनर्जीवीत करण्यासाठी कयाधू उपखोरे महाराष्ट्र शासनाच्या अजेंड्यावर घेतले आहे. अशा प्रकारचा अध्यादेश शासनाने काढावा व प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात यावी अशी चर्चा खा. दानवे यांच्या सोबत केल्यानंतर त्यांनी याबाबत मी मुख्यमंत्र्यासोबत बोलून कयाधू नदी पुनर्जीवीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दानवे यांनी दिले आहे. यामुळे कयाधू नदी पुनर्जीवनाचा मार्ग लवकरच मार्गी लागणार आहे, अशी माहिती भाजप नेते रामरतन शिंदे यांनी दिली असून कयाधू नदीच्या पुनर्जीवनासाठी खेडोपाडी जनजागृती अभियान सुद्धा सुरू आहे.

No comments:

Post a Comment