संपूर्ण महाराष्ट्राच भूषण येथील मानवलोक या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक कार्यवाह व जेष्ठ समाज सेवक डॉ. द्वारकादासजी लोहिया उर्फ बाबूजी यांचे रात्री 10.45 वाजता येथील आशा आय सी यु सेंटर मध्ये दुःखद निधन झाले उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मानवलोक या स्वयंमसेवी संस्थे च्या माध्यमातून कृषी, जलसंधारण या क्षेत्रात काम करून देश विदेशात आपली ओळख निर्माण करणारे आणि ज्यांच्या नावाचा आजही प्रशासनात एक आदरयुक्त दरारा आहे, ज्यांच्या मुळे अंबाजोगाई तालुक्यातील हजारो वयोवृध्द, विधवा, परितक्त्या, अंध, अपंग, आशा वंचित घटकास आज शासनाच्या योजनेचा लाभ मिळतो आहे, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करायचं झाल्यास ज्यांची हाक येताच आजही हजारो वयोवृध्द शहरातूनच नव्हे तर खेड्यापाड्यातून हाता मध्ये काठी टेकवत येऊन रस्त्यावर उतरतात, तरुणाला लाजवेल अस ज्याचं सामाजिक क्षेत्रात कार्य आहे असे जेष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादासजी लोहिया यांना प्रकृती अस्वस्था मुळे गेल्या पंधरा दिवसा पूर्वी त्यांच्या सुनबाई डॉ. शुभदा लोहिया यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र त्या नंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत जाऊ लागल्याने व औषध उपचारास ते कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना पाच सहा दिवसा पूर्वी येथील डॉ. नवनाथ घुगे यांच्या आशा आय सी यु सेंटर मध्ये उपचरार्थ हलवण्यात आले होते, त्या नंतर ही त्यांच्या प्रकृती मध्ये कुठल्याची प्रकारची सुधारणा झाली नाही आणि रात्री 10.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी रात्रीच रीघ लागली आहे.
आज दुपारी 2 वाजता करण्यात येणार अंत्यसंस्कार
आज दुपारी 12 वाजता त्यांची अंत्य यात्रा निघून दुपारी २ वाजता मानवलोक मुख्या कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे.
राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनात राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी ओळख संपुर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोंचविले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्यां महिलांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते.
=====================
Attachments area

No comments:
Post a Comment