लातूर - भाजपचे बीड जिल्हा परिषद समाजकल्याणचे सभापती संतोष हांगे आणि अन्य दोघांविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस पदावर भरती करतो म्हणून ७ लाख रुपये घेतले असल्याचा आरोप संतोष हांगे यांच्यावर आहे.
बळीराम बाबासाहेब गुटे (रा.चाटा ता. जि. लातूर) याच्याकडून रेल्वे भरती करण्याचे अमिष दाखवून ७ लाख रुपये संतोष हांगे, गणेश आधंळकर आणि मुकुंद गोरखनाथ काळे यांनी घेतल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर या तिघांनी तिकिट तपसणीस पदाच्या भरतीचे बनावट आदेशही दिले. हे आदेश बनावट असल्याचे समजताच बळीराम गुटे यांनी बुधवारी मुरूड येथील पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील या तिघांविरोधात तक्रार नोंद केली. संतोष हांगे हे बीड जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील तिघांवर ४२०, ४६७, ४६८, ४७१, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
कशी झाली फसवणूक -
२९ ऑॅक्टोंबर २०१३ ला गणेश आंधळकर, संतोष हांगे व मुकूंद काळे यांनी बळीराम गुटे याच्याकडून ७ लाख रुपये घेतले. याप्रकरणी गुटे यांना नोकरीवर रुजू होण्यासंदर्भात सातत्याने आश्वासन दिले जात होते. मात्र, दिले नाही. तेव्हा गुटे यांनी तगादा लावला. मग या तिघांनी पश्चिम रेल्वेच्या तिकिट तपासणीस पदाच्या भरतीचे बनावट नियुक्ती पत्रक दिले. त्यानुसार गुटे यांची मेडिकल तपासणीही झाली. परंतु, ते कोलकत्ता येथे रुजू होण्यास गेले असता हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

No comments:
Post a Comment