सेनगावात निराधारांच्या प्रश्नांवर कॉंग्रेस आक्रमक सुक्ष्म तपासणीचे नाट्य थांबवा अन्यथा तिव्र आंदोलन

Thursday, November 22, 2018
सेनगाव / प्रतिनिधी
सेनगाव तहसील कार्यालयावर खा.राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कॉंग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजूर यांच्या विविध मागण्या मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या मोर्चात सुक्ष्म तपासणीच्या नावाखाली मोठ्या संख्येने वगळण्यात आलेले निराधार लाभार्थी सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी उपस्थीत जनसमुदायाला मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी निराधाराच्या प्रश्नावर महसुल कार्यालयाच्या वतीने निराधार योजनेची सूक्ष्म तपासणीच्या नावाखाली शेकडो लाभार्थ्यांचे मानधन स्थगीत करण्यात आले असल्यामुळे निराधार लाभार्थी वर उपासमारीची वेळ आली असून, अशा लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान पूर्ववत चालू करावे अन्यथा आक्रमकपणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. तर तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी तालुक्यात दुष्काळ घोषीत झाला तरी अद्याप दुष्काळीपरिस्थीतीवर मात करण्यासाठी रोहयोची कामे सुरु नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे. भाजपा सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी शेतमजुर संकटात सापडला असल्याची टिका करीत दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत करावी, रोजगार हमी योजनेची कामे तातडीने चालू करून मजुरांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली. यावेळी कॉग्रेंसच्यावतीने विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सतीश खाडे, अशोकराव सरनाईक, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष रवि पाटील गोरेगावकर, तालुकाध्यक्ष शामराव जगताप यांनी मार्गदर्शन केले. निवेदनावर शहराध्यक्ष बापुराव बांगर, डॉ.राजेश भोसले, लक्ष्मणराव मुळे, कॉंग्रेस प्रवक्ते विलास गोरे, नगरसेवक अजय विटकरे, बंटी नागरे, बाळु कदम, शेख ऐजाज, संतोष पोले, शासन कांबळे, नागोराव फासाटे, नारायणराव मगर, विठ्ठल अंभोरे, पंडितराव खाडे, श्रीरंग कायंदे, डॉ.माणिक देशमुख, पंडितराव ढाकणे,अशोक सानप, ज्ञानेश्वर थोरवे, सुरेश देशमुख, प्रविण पायघन, राजु देसाई, गजानन गिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment