हा तर महिलांच्या सौभाग्य अलंकारांचा अवमान

Friday, November 23, 2018
लातूर/प्रतिनिधी :एकीकडे महिला सक्षम आहेत म्हणून त्यांच्यासाठी ५० टक्के आरक्षण मागायचे आणि दुसरीकडे निष्क्रीयतेचे प्रतीक म्हणून त्यांचेच सौभाग्य अलंकार देवून निषेध करायचा, हा महिलांच्या सौभाग्य अलंकारांचा अवमान आहे. या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी नगरसेविका रागिनी यादव यांनी केली आहे .



नुकत्याच झालेल्या महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर निष्क्रीय आहेत असे म्हणत त्यांचा निषेध करण्यासाठी साडी - चोळी ,बांगड्या आदी वस्तु दिल्या .मुस्लिम महिलांचा बुरखाही देण्यात आला .मुळात महिलांना समान वाटा द्यावा ,आरक्षण द्यावे अशा मागण्या होत आहेत. त्यापेक्षाही स्वतःच्या कर्तृत्वाने महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत .असे असताना महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या वस्तू निषेधासाठी वापरणे हा अवमान आहे स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रकार आहे .त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी ,अशी मागणी रागिनी यादव यांच्यासह नगरसेविकानी पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .

No comments:

Post a Comment