लातूर दि प्रतिनिधी
नगरोत्थान योजना ,दलित वस्ती विकास ,जिल्हा नियोजन मंडळाकडून शहरातील विविध प्रभागात करावयाच्या विकास कामासाठी आलेल्या निधीचे असमान वाटप झाल्याचा आक्षेप घेऊन काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांना धारेवर धरले आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज रोखून धरले दीड तासानंतर महापौरांनी कामकाज एक तासासाठी तहकूब करत असल्याचे जाहीर केले.
लातूर शहर मनपाची सर्वसाधारण सभा सोमवारी महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती यावेळी आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर ,उपमहापौर देविदास काळे, उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी विविध योजनेअंतर्गत आलेल्या निधी वाटप करताना महापौरानी पक्षपाती धोरण अवलंबिले असा आरोप करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले विरोधी पक्षनेते दीपक सूळ विक्रांत गोजमगुंडे, रविशंकर जाधव ,सचिन बंडापल्ले , अहमदखां पठान यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नगरसेवकांनी जमिनीवर ठिय्या मांडला.
शासनाकडून विविध योजनेअंतर्गत 30 कोटी आले असताना महापौरानी 52 कोटीची कामे मंजूर केली ते भाजपच्या नगरसेवकांचीही दिशाभूल केली आहे असा आरोप विक्रांत गोजमगुंडे यांनी केला महापौरांनी मात्र शासनाच्या जी आर प्रमाणे नियमानुसारच होत असल्याचे स्पष्टीकरण दिले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी विविध प्रभागात उपरोक्त योजनेअंतर्गत करावयाची विकास कामाची यादी अद्याप माझ्याकडे आलेली नाही किंवा प्रस्तावही आलेला नाही या शिवाय उपलब्ध निधीच्या दीड पटीत कामे मंजूर करता येतात परंतु या विषयावर चर्चा करण्याचा अधिकार मला नसल्याचे स्पष्ट केले
दीपक सूळ यांनी हा विषय आयुक्तांनी खंडित करावा किंवा रद्द करावा कारण या विषयावर सभागृहात चर्चा झालेली नाही किंवा इतिवृतातही विषय आलेला नाही असे बोलून त्यांनी महापौरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले महापौरांनी हिम्मत असेल तर माझ्याविरुद्ध मानहानीचा दावा करावा हे माझे खुले आव्हान आहे मागच्या इतिवृत्तातील काही विषयावर मतदान घेण्यात यांवे अशी मागणीही दीपक सूळ यांनी केली या गदारोळादरम्यान काँग्रेसच्या सदस्यांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली महिला नगरसेवक पूजा पंचाक्षरी ,सपना किसवे ,रेहाना पठाण यांच्या सह अन्य नगरसेविकांनी महापौर यांना साडी चोळी आणि बांगड्याची भेट देण्याचा प्रयत्न केला
या वेळी गदारोळमुळे पुढचे कामकाज सुरु होऊ शकले नाही सभागृहाचा मूड पाहून महापौर सुरेश पवार यांनी सभागृहाचे कामकाज १ तासासाठी तहकूब करत असल्याचे जाहीर केले आजच्या सर्वसाधारण सभेसाठी परिवहन समितीची नियुक्ती , ह्या प्रमुख विषयासह ११ विषय कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आले आहे .

No comments:
Post a Comment