परिवहन समिती अखेर गठीत दोन्ही पक्षाकडून कार्यकर्त्याना संधी

Tuesday, November 20, 2018


लातूर :मागील दिड वर्षापासुन रखडलेली परिवहन समिती अखेर गठीत करण्यात आली असुन या समितीला काल झालेल्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे .विशेष म्हणजे बारा सदस्यांच्या या समितीत भाजपाच्या केवळ एका नगरसेवकाचा समावेश असुन दोन्ही पक्षानी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना समितीवर सदस्य म्हणून संधी दिली आहे 

काठावरचे बहुमत असल्याने आणि समितीमध्ये समसमान सदस्य असल्याने सभापती कोणाचा हा विषय प्रारंभापासुनच चर्चेत आहे. कदाचित यामुळेच समिती गठीत करण्यास सत्ताधाऱ्यानी उशीर केला असावा .पण यामुळे नाराजी वाढत गेली. गटबाजी सुरू झाली या कारणानी समितीची निवड करावी लागली .काल झालेल्या सभेत पालिका सदस्यानी समितीच्या सदस्यांची निवड केली .समितीमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत .

सत्ताधारी भाजपाने मंगेश बिराजदार या एकमेव नगरसेवकास समितीत स्थान दिले .याशिवाय शिवदास मिटकरी ,धनंजय हाके , संपत पाटील ,हेमंत जाधव व दीपक आवस्कर याना स्थान दिले. विरोधी कॉंग्रेसने एकाही नगरसेवकाला संधी न देता कार्यकर्त्याना स्थान दिले .यात धोंडीराम यादव ,राम चलवाड ,संदीप मोहिते ,इसराज सगरे ,जीवन सुरवसे व राजेश उटगे यांचा समावेश आहे .

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment