लोकसभा आणि विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवा :प्रदेशाध्यक्ष चव्हाण

Thursday, October 25, 2018


  • आ अमित देशमुख यांच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे आहोत 
  • अभूतपूर्व ऐतिहासिक नियोजनबद्ध सभेने जनसंघर्ष यात्रेची मशाल पेटली 



लातूर सत्यजीत बद्दर 
काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लातूरच्या टाऊन हॉल च्या मैदनावर ऐतिहासिक, सुरेख , नियोजनबद्ध ,अलोट गर्दीत अभूतपूर्व उत्साहात मशाल पेटवण्यात आली . टाऊन हॉल च्या आतापर्यंतच्या सर्व सभेचे रेकॉर्ड ब्रेक सभा होती . या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण , माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , बाळासाहेब थोरात , हर्षवर्धन पाटील , आ अमित देशमुख , दिलीपराव देशमुख,यांची भाषणे झाली ज्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली लोकात प्रचंड उत्साह होता घोषणाबाजी व टाळ्यांच्या कडकडाटात हि सभा झाली . 


या सभेस संबोधित करताना माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी देशात आणि राज्यात प्रचंड अराजकता निर्माण झाली आहे अशा प्रकारची टीका करून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भयमुक्त वातावरण करण्यासाठी काँग्रेसाचा झेंडा लोकसभा सह मुंबईच्या विधासभेवर फडकवा असे आवाहन केले .

लोकशाहीची क्रूर चेष्ठा सुरु आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश पत्रकार परिषद घेऊन लोकशाहीच्या धोक्यासंदर्भात बोलत आहेत सीबीआय च्या अधिकाऱ्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी म्हणजे लोकशाही समपुष्टात येत आहे . मराठवाड्याचे मंत्री हे एका तालुक्याचे होत आहेत दुष्काळ रस्ते पाणीटंचाई या कडे कोणाचे लक्ष नाही फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी असं चित्र असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले . 

लोकशाहीच्या रक्षाणासाठी भविष्यात निवडणूक घ्याची असेल तर सत्तेपासून या भाजपला रोखा अन्यथा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलीं घटना सुद्धा हे बदलून टाकतील व देशामध्ये अराजकता माजेल निवडणूकसुद्धा घेणार नाहीत असाही आरोप या वेळी केला . शिवस्मारकासंदर्भात मेटे यांचा आरोप व बोटीचा अपघात हा योगायोग आहे कि घातपात आहे असा हि सवाल केला .

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यसरकार वर घणाघाती टीका करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेस ला विजयी करण्याचे आवाहन केले तर औरंगाबाद ला मराठवाडा मंत्रिमंडळाची बैठक झाली १९ कलमी कार्यक्रम जाहीर झाला पण प्रत्यक्षात मात्र १४ कलामांना स्पर्श हि केला नाही बेरोजगारी वाढत आहे मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे या सर्वचं उत्तर म्हणजे केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आणण्याची विनंती केली .

माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसच्या कारकिर्दीत घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे आज विज्ञानाची प्रगती दिसून येत आहे केंद्रातील सरकार चुकीचे कायदे करत आहे तीन तलाक हा कायदा कसा चुकीचा आहे याचा ऊहापोह करून अमित देशमुख यांच्या नियोजनाला धन्यवाद दिले .

दिलीपराव देशमुख यांनी या सरकारच्या काळात गुन्हेगारांना सौरक्षण मिळत आहे आणि सज्जनांना जेल मध्ये जावे लागत आहे आज मंत्री भयभीत आहेत ते बोलत नाहीत कोठे अच्छे दिन आहेत हे शोधायची वेळ आली आहे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशाला चलेजाव म्हटले होते तसे यांना दिल्ली छोडो मुंबई छोडो हा इशारा या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे . 

माजी मंत्री आ अमित देशमुख अत्यंत विनम्रतेने स्वर्गीय शंकर रावजी चव्हाण स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची आठवण होते असे सांगून खून ,दरोडे ,वाढत आहेत आणि लातूर जिल्ह्याबद्दल तर बोलायलाच नको असे म्हणत घणाघाती टीका केली या सभेस माजी मंत्री आ बसवराज पाटील , आ भिसे नाना आ मधुकरराव चव्हाण अर्चना पाटील व्यंकट बेद्रे , वैजनाथ शिंदे , विक्रमतात्या गोजमगुंडे आदी होते 

आ अमित देशमुखांचे सर्वाकडून कौतुक 
सभेबद्दल बोलताना शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले कि हि सभा आ अमित देशमुख यांच्या विजयी सभा असे वाटते तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि मी खूप सभा पाहिल्यात पण एवढे भव्यदिव्य स्टेज व तेवढाच मोठा जनसमुदाय समोर आहे बोलवे तरी कोठे पाहून बोलावे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले अत्यंत सुरेख सभा व त्याचे नियोजन आ अमित देशमुख यांनी केले त्या बद्दल मी त्याचे अभिनंदन करतो

प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले कि आ अमित देशमुख यांनी जी मशाल या ठिकाणी पेटवली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात पोहचावी असे मत व्यक्त केलेअत्यंत कल्पक पद्धतीने हि सभा आयोजित केली त्या बद्दल त्यांचे अभिनंदन , हर्षवर्धन पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अमित देशमुख यांना फिरू द्यावे लातूरपुरते मर्यादित ठेऊ नये असे मत व्यक्त केले


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment