रोहितला संघात स्थान नाही, हरभजन नाराज

Tuesday, October 2, 2018

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने कुशल नेतृत्व करताना सलामीच्या फलंदाजाची कामगिरी उत्तमरीत्या निभावली आणि त्यामुळेच भारताने सातव्यांदा आशिया चषक जिंकला. रोहितने पाच सामन्यांतून ३१७ धावा फटकावल्या.

एकदिवसीय क्रमवारीत कोहलीपाठोपाठ दुसरे स्थान मिळवलेल्या रोहित शर्माला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी मात्र भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल आणि हनुमा विहारीला स्थान मिळत असताना अनुभवी रोहित शर्माचा विचार न केल्यामुळे कसोटीपटू हरभजन सिंग नाराज झाला आहे. ट्विटरद्धारे त्याने आपली नाराजी दर्शवताना म्हटले, भारतीय कसोटी संघात रोहित शर्माचा समावेश नाही. निवड समितीने काय निकष लावून संघ निवडला आहे, कोणी मला सांगू शकेल का? रोहितवरचा अन्याय मी पचवू शकत नाही. रोहित शर्माने २०१३ साली कसोटी संघात पदार्पण केले. आतापर्यंत त्याने २५ कसोटी सामन्यांतून १४७९ धावा केल्या आहेत.

No comments:

Post a Comment