औसा दि प्रतिनिधी
केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे घोषनाबाज सरकार कृतीत पालन करत नाही या सरकारच्या विध्वंसंक कारवह्यांना आला घालावाच लागेल ही दोन्ही सरकारे खाली खेचण्यासाठी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाने एल्गार पुकारला आहे जनतेने या कामी पुरेपूर साथ द्यावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचेअध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने तुळजापुरात आई तुळजाभवानी चे दर्शन घेऊन औसा येथे झालेल्या जनसंघर्ष यात्रेच्या 3 टप्यातील पहिल्या वीराट जाहीर सभेत बोलत होते . या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मलिकार्जुन खरगे , सुशील कुमार शिंदे,शिवराज पाटील चाकूरकर,पृथ्वीराज चव्हाण ,बाळासाहेब थोरात ,हर्षवर्धन पाटील,औसा येथील सभेचे मुख्य संयोजक आ बस्वराज पाटील ,आ मधुकरराव चव्हाण,आ अमित देशमुख, आ त्र्यंबक भिसे,आ सुनील केदार,अशोक पाटील निलंगेकर हे होते.
प्रगती सुबत्ता ,रोजगार ,सिंचन आदी सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची पीछेहाट झाली असल्याचे नमूद करून फडणवीस सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केला आगामी काळात जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाला टाकत मिळाली नाही तर भयावह चित्र निर्माण होईल असे बोलून अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली
आज सार्वजनिक संस्था मोडीत काढन्याचे काम होत आहे न्यायपालिकेतही राजकीय हस्तक्षेप वाढला आहे या कडे त्यांनी लक्ष वेधले
समस्त मराठवाडा आज दुष्काळाच्या सावताट असताना शासनाच्या नियमावलीत नसलेला दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ वगळता दुष्काळ नसल्याचा जावई शोध या सरकारने लावला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावं आणि इथला दुष्काळ दाखवा असा टोलाही अशोकराव चव्हाण यांनी लगावला
हे सरकार कोणतेही निर्णय घेताना काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतले जात नाही असे बोलून फडणवीस साहेब कुठे नेहून ठेवलाय लातूर माझा, मराठवाडा माझा असा त्यांना जाब विचारला असे आवाहन त्यांनी या वेळी केले
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment