आक्रमक शेतकऱ्यांचे 33 केव्हीवर आंदोलन रामरतन शिंदेेंच्या मध्यस्तीने विजपुरवठा सुरळीत

Wednesday, October 24, 2018


हिंगोली / प्रतिनिधी 
पुसेगाव येथील 33 केव्ही विज केंद्रावर शेतकऱ्यांना विज पुरवठा सुरळीत दिला जात नाही, यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन करून 33 केव्ही बंद पाडला होता. पण भाजप नेते रामरतन शिंदे यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत या प्रश्नावर तोडगा काढल्याने विजपुरवठाही सुरळीत झाला. व शेतकऱ्यांचेही समाधान झाले. 
गेल्या दिड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी सर्व शेतकऱ्यांनी कृषिपंप सुरू केले आहेत. पण पुसेगाव येथील 33 केव्ही विज केंद्रावरून विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शिवणी बु, पार्डी पोहकर, जांभरून रोडगे, वरूड काजी येथील शेतकऱ्यांनी विजेच्या समस्यांवरून 33 केव्ही केंद्रावर आंदोलन सुरू केले.

 व आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी 33 केव्ही कार्यालय बंद पाडले. ही बाब भाजप नेते रामरतन शिंदे यांना समजताच त्यांनी पुसेगाव येथे धाव घेवून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर महावितरण कार्यालयात जावून अभियंता लगडेवार यांच्याशी चर्चा केली. तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी रामगिलवार यांच्याशी भ्रमणध्वणीवरून चर्चा करून या पाचही गावासाठी समान विजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी होकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा निघाला.

No comments:

Post a Comment