भाजपची स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा

Wednesday, October 3, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातून स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेस सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील गाडीपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा यासह अनेक भागात स्वच्छता करण्यात आली व शहरातील मुख्य रस्त्यावरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आ. तान्हाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा. शिवाजीराव माने, माजी आ. गजाननरावजी घुगे, मिलींद यंबल, ज्येष्ठ नेते प्रा.दुर्गादास साकळे, विनोद परतवार, ऍड. के.के.शिंदे, संघटन सरचिटणीस फुलाजीराव शिंदे, शहराध्यक्ष कैलास काबरा, प्रशांत सोनी, बाबा घुगे, तालुका अध्यक्ष संतोष टेकाळे, संजय कावडे, ऍड. अमोल जाधव, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य हमीद प्योवाले, महिला शहरअध्यक्ष कृष्णा रूहटिया, महिला जिल्हा सरचिटणीस रजनी पाटील, गजानन काळे, माणिक लोडे, मनेाज शर्मा, संजय ढेाके, सचिन शिंदे, संदिप वाकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment