हिंगोली / प्रतिनिधी
सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने गेल्या चार वर्षात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. पण प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. या भाजप सरकारच्या कुचकामी धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने येथील गांधी चौकात मुक आंदोलन करून सरकारची कामगिरी उघड पाडणारे पोष्टर लावत 2 ऑक्टोबर रोजी जवाब दो आंदोलन केले. या आंदोलनाला कॉंग्रेसने पाठींबा दिला.
या मुक आंदोलनात कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडावर पट्या बांधत भाजप सरकारचा निषेध केला. विविध पोष्टरमधून भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यामध्ये गांधीजींची तत्वे, सत्य, अहिंसा, शांती असे होते.तर सताधारी पक्षाची तत्वे असत्य हिंसा, अशांती असे आहे, राज्यात प्रस्तापित भुजल अधिनियम लावून शेतकऱ्यांच्या विहीरीतील पाण्याचा वापरावर निर्बंध आणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांना पुर्णपणे संपवायचे आहे का? मेक इन महाराष्ट्र अंतर्गत किती गुंतवणूक झाली, किती रोजगार निर्माण झाला, सरकारने श्वेतपत्रिका का काढली नाही ?, बुलेट ट्रेनच्या मोठ्या स्वप्नांच्या नादात मुंबईतील वाहतुकीच्या दैनंदिन पुलाकडे राज्यसरकार का दुर्लक्ष करते ?, शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची का कमी करण्यात आली ?, विकास दराच्या बाबतीतही केंद्र सरकार जुमलेबाज घोषणा करू लागले आहे काय ? असे विविध पोष्टर लावून जवाब दो आंदोलन केले. या आंदोलनाला माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, कॉंग्रेसचे आ. डॉ. संतोष टारफे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा, माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, तालुका अध्यक्ष माधव कोरडे, शहर अध्यक्ष जावेद राज, जिल्हा सरचिटणीस बी.डी. बांगर, माजी सभापती विनोद नाईक, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, जिल्हा परिषद सदस्य मनिष आखरे, नगरसेवक ऍड. राजेश गोटे, शशिकांत वडकुते, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुजय देशमुख, सुमित्रा टाले, नर्सिंग आण्णा देशमुख, अमित कळासरे, इरफान पठाण यांच्यासह राष्ट्रवादी कॉगे्रस, कॉंगे्रस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment