जयंतीनिमीत्त महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जिल्हाभरात अभिवादन

Wednesday, October 3, 2018

हिंगोली / प्रतिनिधी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाभरात शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था आदी ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात आले. 
विद्यासागर विद्यालयात अभिवादन

खानापूर चित्ता येथील विद्यासागर विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक संजय टाकळगव्हाणकर, ज्येष्ठ शिक्षक संजय नाईक, विठ्ठल सोळंके उपस्थित होते. यावेळी स्नेहा धुळे, तेजस्वी जाधव, निरंजन पुरी, लखन पाईकराव, महेश घुगे, अजय व अर्जुन घुगे, ऋषीकेश सोळंके व शिवराज जाधव यांनी भाषणे केली. भागवत भारती व मयुरी गिरी यांनी गुणगान केले, गांधीजींच्या वेशभूषेत आलेला वैभव मुंढे हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. सुत्रसंचलन सहशिक्षक मोहन धवसे यांनी तर आभार सुभाष सुर्यवंशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सतीश तायडे, रविकुमार अग्रवाल, कैलास शैव यांचेसह सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

कॉंग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गांधी चौकात कॉंग्रेसच्यावतीने महात्मा गांधीजीच्या पुतळयास आ. संतोष टारफे यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, शहराध्यक्ष बापुराव बांगर, विलास गोरे, ज्ञानेश्वर जाधव, नामदेव नागरे, पारसकर, भागोराव राठोड, नगरसेवक माबुद बागवान, आरेफ लाला, मुजीब कुरेशी, श्रीराम जाधव, विशाल घुगे, मयुर राठोड, जुबेर मामु, शेख हनीफ, शासन कांबळे, बशीर मांडवी, रजाक पहेलवान, कदीर बाबा, फय्याज पठाण, शेख अजीज, अनवर पहेलवान, हाजी एकबाल, नईम कुरेशी, शेख इमरान आदींची उपस्थिती होती. 

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन 
माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नारायणराव खेडकर, आबिदअली जहागिरदार, मिलींद उबाळे, ऍड. बी.टी.कावरखे, ज्ञानेश्वर गोटरे, ऍड.अरगडे, ऍड. विराज देशमुख, जहीरभाई ईटवाले, अमोल जमदाडे, शम्मी पठाण, मोहसीन पठाण, मनोज नाटेकर, ईसाक तांबोळी, रंजित पाटील गोरेगावकर, नितीन शेळके, रहेमानभाई, गजानन पाटील, माजी नगरसेवक ताहेरखॉ पठाण, सुहास हलगे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment