हिंगोली / प्रतिनिधी
आज खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या कार्याच्या विचाराची गरज देशाला आहे. सत्य अहिंसा ही तत्व उराशी बाळगुन महात्मा गांधींनी संपुर्ण आयुष्यभर खादी वस्त्र प्रदान करत भारताला स्वतंत्र मिळवून दिले. खादी केवळ वस्त्र नसून ते विचार आहेत, असे प्रतिपादन खादी प्रचारक दादाराव शिंदे यांनी खादी ग्रामोद्योग भवन येथे आयोजित गांधी जयंतीनिमीत्त कार्यक्रमात बोलताना 2 ऑक्टोबर रोजी केले.
महात्मा गांधी जयंती व दसरा, दिवाळीनिमीत्त खादीच्या कापडावर 20 टक्के सुट ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नायब तहसीलदार बोथीकर, मधुकर खंडागळे तर प्रमुख पाहूणे म्हणून डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव हरण, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब क्षिरसागर, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ बांगर, बाबा घुगे, प्रा.टकले, शाहीर प्रकाश दांडेकर, मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष, दौलत बनसोडे, सरपंच मांडगे, पत्रकार शाम सोळंके, राजेश दारव्हेकर, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक गणेश कऱ्हाळे, आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना दादाराव शिंदे म्हणाले की, प्रत्येकांनी खादी वस्त्र प्रदान केले पाहिजे. गांधीजींनी चरखा चालवत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण रेल्वे रोको करतो, चक्का जाम करतो, आडवा आडवी करतो पण मन आडवून खादी वापरत नाही ते आपण केले पाहिजे. विचाराबरोबरच आचरण महत्वाचे आहे. निरोगी रहायचे असेल तर खादीशिवाय पर्याय नाही. देशातील एका व्यक्तीने पाच मीटर खादी कापड वापरले तर दोन कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो. मजबुरीचे नाव महात्मा गांधी नाही तर मजबुतीचे नाव महात्मा गांधी आहे. कार्यक्रमाचे सुत्रसचंलन राधाकिशन कऱ्हाळे यांनी केले.

No comments:
Post a Comment