कळमनुरी / प्रतिनिधी
कयाधु ग्रामविकास प्रतिष्ठाण व डॉक्टर असोसिएशन कळमनुरीच्या वतीने कयाधु ग्रामविकास प्रतिष्ठाण माहेर उमरा येेथे 30 सप्टेबर रोजी मधुमेह, रक्तदाब तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 177 रूग्णांची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबीराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. संतोष टारफे, उद्घाटक म्हणून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ किशोरप्रसाद श्रीवास तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे ह्दयरोग तज्ञ डॉ. व्यंक टेश काब्दे, डॉ. गोपाल कदम, डॉ. संजय नाकाडे यांची उपस्थिती होती. मधुमेह, रक्तदाब तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबीरात एकूण 177 रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 110 रूग्णांचे ईसीजी व सर्व रूग्णांचे मधुमेह तपासणी करण्यात आली. मानवाची बदललेली जीवनशैली, अनियमित आहार, मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

No comments:
Post a Comment