हिंगोली / प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ड झोन आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींच्या खो-खो, मुलींची कब्बडी, क्रिडा प्रकारात आदर्श महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ऍथलॅटीक्स स्पर्धेतही यश मिळविले.
मुलींच्या खो-खो मध्ये आदर्श महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. यामध्ये चंद्रकला जाधव, पुजा गौड, निकीता मईंग, शिवकन्या जाधव, काजल भाटी, माधुरी गव्हाणकर, विद्या खोकले, शिवानी सुरोशे, भाग्यश्री धोतरे, पुजा झोरे, वैष्णवी जैस्वाल, जाधव आश्विनी या विद्यार्थीनींचा सहभाग होता. तर कब्बडी संघामध्ये पुजा झोरे, वैष्णवी जैस्वाल, पुजा भोसले, शिवकन्या जाधव, विद्या खोकले, शिवाजी सुरोसे, माधुरी गव्हाणकर, रेवती श्रीमंगले, काजल भाटी, चंद्रकला जाधव, पुजा गौड, निकीता मईंग यांच्या संघाने प्रथम क्र मांक मिळविला. ऍथलॅटीक्स स्पर्धेमध्ये शंभर मीटर धावणे, काजल भाटी प्रथम, लांब उडी चंद्रकला जाधव तृतीय, शंभर मीटर धावणे शेख अफरोज शेख प्रथम, दोनशे मीटर धावणे चंद्रकला जाधव प्रथम, पुजा गौड द्वितीय, चारशे मीटर धावणे चंद्रकला जाधव द्वितीय, आठशे मीटर धावणे भाग्यश्री धोतरे तृतीय, पंधराशे मीटर धावणे शिवकन्या जाधव तृतीय, रिले क्रिडा प्रकारात आदर्श महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. एकंदरीत खो-खो, कब्बडी, धावणे आदी क्रिडा प्रकारात आदर्श महाविद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला आहे.

No comments:
Post a Comment