आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
येथील स्थानिक पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी सरपंच म. जिया उर्फ बाबासेठ कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कैलाशचंद वाघमारे यांची उपस्थिती होती. दिपप्रज्वलन सामाजिक कार्यकर्ते ओंकार अमाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सपोनि उमाकांत चिंचोलकर, जि.प.सदस्य अजित मगर, उपसरपंच विजय बोंढारे, शहाजी पाटील, शे.सलीम, रूपेश वडगावकर, यशवंत पंडीत, भरत देसाई, वाजेद खान पठाण, शिवा तेल्लावार, बबन हेंद्रे, अनिल अमिलकंठवार, गजानन अग्रवाल, सुदर्शन व्यवहारे, ओम ठमके, सुभाष कोकरे, प्रशांत सुर्यवंशी, रंगनाथ नरवाडे, सदाशिव हाडे, दिपक देशमुख आदींनी सदीच्छा भेट दिली. यावेळी दिपक पवार, प्रकाश कोकडवार, ज्ञानेश्वर पतंगे, संजय हापसे, चंद्रकांत धुळे यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. सुत्रसंचलन विठ्ठल पंडीत यांन तर प्रास्ताविक व आभार तुकाराम पांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संतोष कुंभकर्ण, अमोल पंडीत, सचिन हाटकर, पांडुरंग फुलाते, दिवेश पंडीत, रोहित पंडीत, कोंडबा कवठेकर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment