लातूर: एकीकडे बेरोजगारी वाढत असल्याची ओरड होत आहे .असे असतानाही शेतकऱ्याना सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाहीत .हाताशी येणारे पीक पदरात पडावे यासाठी शेतकऱ्याना मजुरांच्या पाया पडावे लागत आहे .परंतु यंदा त्यावर तोडगा निघाला असून मध्य प्रदेशातील मजूर सोयाबीन काढणी साठी रेणापुरात दाखल झाले आहेत.
दरवर्षी सोयाबीन काढणीच्या काळात आगाऊ पैसे देऊनही शेतकऱ्याना मजुरांच्या हातापाया पडण्याची पाळी येते .हजारो रुपये देऊनही मजूर कामाला येत नाहीत. जवळपास सहा महिने कष्ट करून पीक हाताशी आल्यानंतर ते वेळेत काढले नाही तर वाया जाण्याची भीती असते .याच या काळात पाऊस येण्याचीही शक्यता असते .त्यामुळे मजूर मागतील तेवढे पैसे शेतकरी देतात. तरीही एकाच वेळी अनेकांची कामे घेतलेली असल्याने मजूर वेळेवर येत नाहीत .
यावर्षी मध्यप्रदेशातील हजारो मजूर सोयाबीन काढणीसाठी रेणापूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्या प्रदेशात रोजगार कमी असल्याने किंवा कमी काळात अधिक पैसे मिळत असल्याने हे मजूर येथे आले असावेत. रेणापूर तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात हे मजूर दाखल झाले आहेत. रेणापूर शहरालगत पानगाव फाटा येथे या मजुरांनी राहुट्या ठोकल्या आहेत .रेणापूर तालुक्यात एक सोयाबीन पिशवी काढणीसाठी ३५०० रुपये दर आहे .परराज्यातील हे मजूर २५०० रुपयात एक पिशवी काढत आहेत .यामुळे शेतकऱ्यांचे एक हजार रुपये वाचत आहेत .पानगाव येथेही शेकडो मजूर मुक्कामी आहेत. शेतकरी बोलावण्यास आला की लगेच हे मजूर कामावर जात असल्याने यंदा शेतकऱ्याना मजुरांच्या पाया पडण्याची वेळ येणार नाही .

No comments:
Post a Comment