जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुमठाने यांची बदली

Wednesday, October 3, 2018


लातूर: जिल्हा मार्केटिंग अधिकारी म्हणून लातूर येथे कार्यरत असणारे सुमठाणे यांची बदली झाली असून सध्या रेणापूर येथे कार्यरत असणारे लटपटे यांची त्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे .

सुमठाणे यांच्या कार्यपद्धती बाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दाखल घेत या विभागाच्या कार्यकारी संचालक म्हैसेकर यांनी सुमठाणे यांची बदली केली .त्यांच्या जागी रेणापूर येथे असणारे लटपटे यांना नेमणूक देण्यात आली आहे .लटपटे हे पुर्वी गंगाखेड येथे कार्यरत होते .तेथून ते रेणापूरला आले होते .आता त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे .लटपटे हे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध आहेत .त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करतील असा सर्वांना विश्वास आहे .या कारणामुळे लटपटे यांच्या नियुक्तीचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे

No comments:

Post a Comment