मुंबई : अभिनेत्री नीरू अग्रवाल 'ये है मोहोब्बते' या मालिकेत नीलूची भूमिका साकारणारी हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या चार-पाच दिवसांपासून नीरू तापाने फणफणली होती. शरीरातील उष्णता वाढल्याने नीरू घरीच बेशुद्ध -पडली. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नीरूचा मृत्यू झाला. नीरूच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि पती आहेत. 'ये है मोहोब्बते' मालिकेत इशिताची भूमिका साकारणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीने मालिकेतील जोडीदाराच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. नीलू तू अचानक आमच्यातून निघून गेलीस. आज मला आपल्यात शेवटचे झालेले संभाषण चांगलेच आठवत आहे. तुझ्या मुलांबद्दल असलेला गर्व तुझ्या बोलण्यातून मला जाणवत होता. तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस, हे मला तुला सांगायला हवे होते. तू जिथे आहेस, तिथे खूश राहा... तू नेहमीच माझ्या स्मरणात राहशील..

No comments:
Post a Comment