नागपूर-मुंबई गाडीच्या वेळापत्रक बदलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक

Tuesday, October 23, 2018

आ.मुटकुळेंनी केला होता पाठपुरावा 

हिंगोली / प्रतिनिधी 
नागपूर-मुंबई औरंगाबाद मार्गे जाणारी गाडी आठवड्यातून एक दिवस आहे. त्याचबरोबर या गाडीचे वेळापत्रक प्रशासकीय दृष्टया सोयीचे नसल्याने वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील लोकांना मुंबई जाणे गैरसोयीचे ठरत आहे. याबाबत या रेल्वे वेळापत्रकात योग्य त्या बदलाची शिफारस रेल्वेमंत्र्याकडे करावी, अशी मागणी आ. मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याबाबत रेल्वेमंत्र्यालयाकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. 

नागपूर-मुंबई औंरगाबाद मार्गे धावणारी गाडी आठवड्यातून केवळ एक दिवस आहे. ती नागपूरहून शुक्रवारी निघुन शनिवारी दुपारी 2 वाजता मुंबईत पोहोचते. प्रशासकीय दृष्ट्या या गाडीचे वेळ व दिवस जनतेच्या कोणत्याही उपयोगी नसून वाशिम, हिंगोली या जिल्ह्यातील लोकांना मुंबईला जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

 त्यामुळे सदरील गाडी सुपरफास्ट करावी, आठवडयातून किमान चार दिवस या गाडीच्या फेऱ्या करण्यात याव्यात, अशी मागणी आ. मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत केंद्रीय मंत्र्यांना पत्र देवून ही समस्या मांडली असता केंद्रीय मंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेत नागपूर-मुंबई गाडीबाबत रेल्वे सचिवालयाला योग्य त्या सुचना दिल्या असून येत्या काळात यामध्ये बदल करण्यात येईल, असे आश्वासित करण्यात आले आहे. यासाठी आ. तान्हाजीराव मुटकुळे यांनी पाठपुरावा केला आहे.

No comments:

Post a Comment