पप्पी डॉग कॅटॅगरीत लातूरच्या जेनीला प्रथम पारितोषीक
लातूर, दि.२३ ः पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथे पुना केनल कॉन्फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ११२ व्या आणि ११३ व्या चॅम्पियनशिप नॅशनल डॉग स्पर्धेत देश, विदेशातील जवळपास २७० पेक्षा अधिक श्वानांचा सहभाग होता. या डॉग शोमध्ये लातूर येथील विवेक नरहरे यांच्या फिमेल डॉग जेनी, लेब्राडोर कुत्र्याने भाग घेतला होता. या स्पर्धेत पप्पी डॉग कॅटॅगरीत लातूरच्या जेनीला प्रथम पारितोषीक पटकावून गौरव प्राप्त केला आहे.
रविवार दि. २१ पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या पुना केनल कॉन्फेडरेशनचे सचिव विजय पटवर्धन व प्रमुख आयोजक योगेश आकुलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती दिली आहे. विजेत्यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातींच्या श्वानांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वानांनी भाग घेतला होता.
लातूर येथील विवेक नरहरे यांच्या जेनीने तिच्या बरोबरीतल्या तब्बल १० स्पर्धकांमधे पहिला क्रमांक मिळवला. ती लैब्राडोर जातीतील सर्वोत्कृष्ट कुत्र्याचा पुरस्कार आणि गनडॉग ग्रुपमधील सर्वोत्तम पिल्लू पुरस्कार जिंकला. ही फक्त तिच्या उपलब्धिंची सुरूवात आहे. आणि भविष्यात तिला अशाप्रकारच्या अनेक यशोशीखरे पादाक्रांत करण्याचा विश्वास ही येथील तज्ञ आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातील मुकुल वैद्य व संजय देसाई यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. जेनीने मिळवलेल्या या यशामागे ट्रेनर गणेश टिकवडे व विवेक नरहरे यांचे खुप मोठे परिश्रम राहिले आहे. तसेच यासाठी वेळोवेळी पेट पॅराडाईज फुड सप्लायरचे संचालक लक्ष्मण मद्देवाड, पशुचिकीत्सक डॉ. नेताजी शिंदे आदींनी मार्गदर्शन केले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment