लातूर: सत्संग आणि कथा श्रवणासाठी आतुर असणाऱ्या लातूर आणि नांदेड येथील भक्तांना पुढील काही दिवसात सत्संगाची अभूतपूर्व मेजवानी मिळणार आहे.लातूर, खरोळा आणि नांदेड येथे सत्संग आणि कथांचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे या दोन्ही संत नगरीत नामस्मरण आणि सत्संग होणार आहे.
नांदेड येथे दि. 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत मॉं कनकेश्वरी देवी यांची भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे .नवा मोंढा येथे ही कथा होणार असून याची जय्यत तयारी संयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे .
लातूर येथील बालाजी मंदिरात दि. 14 ते 21 डिसेंबर या कालावधीत प.पू. रमेशभाई ओझा यांची कथा संपन्न होणार आहे . दररोज दुपारी ३ ते ७ या कालावधीत ही कथा संपन्न होणार असल्याची माहिती हरिप्रसाद मालू यांनी दिली. बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. यानिमित्त दि.8 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांची रामकथा संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली .या कालावधीत दररोज भजन ,कीर्तन ,सत्संग ,प्रवचन आणि होम हवन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत कांचीपूरम् येथील जगद्गुरु यांचेही प्रवचन होणार असून सर्व विश्वस्त मंडळी या कार्यक्रमाचे नियोजन करत असल्याची माहितीही विनोद अग्रवाल यांनी दिली.रेणापूर तालुक्यातील खरोळा येथेही रामराव ढोक महाराज यांची राम कथा होणार आहे. दि. 15 ते 21 एप्रिल या कालावधीत ही कथा होणार आहे .
लातूर व नांदेड ही दोन्ही शहरे संत नगरी म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु गेल्या काही दिवसात येथे होणाऱ्या सत्संगामध्ये खंड पडला होता. आता पुन्हा एकदा कथा, प्रवचन आदींचे करण्यात आयोजन करण्यात आल्यामुळे सत्संगासाठी आतुर असणाऱ्या भक्तांना अभूतपूर्व मेजवानी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment