रेणापूर :तालुका दंडाधिकारी तथा रेणापूरच्या तहसीलदार सौ.मंजुषा लटपटे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे .लक्ष द्यावयास हवे त्या ठिकाणी तहसीलदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेक घटना घडत आहेत .अशाच एका घटनेत आज शनिवारी एका मजुराचा बळी गेला.तालुक्यात वाळूमाफियांनी हैदोस घातलेला आहे .तहसीलदारांनी वेळीच हा प्रकार थांबवला असता तर हा प्रकार घडला नसता .त्यामुळे वाळू माफिया कडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे .
रेणापूर तालुक्यात वाळूचा धंदा जोरात सुरू आहे .वाळू उत्खनन आणि विक्री या संदर्भातील नियंत्रणाची जबाबदारी महसूल विभागाची असते .जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे कडक आणि शिस्तीचे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सर्व विभागांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असताना लटपटे यांच्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला बट्टा लागत आहे. तालुक्यात वाळु व्यावसायिकांनी शासकीय अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार पूर्वी घडले आहेत. यापूर्वीही या धंद्यात काही जणांनी आपले प्राण गमावले आहेत .
असाच प्रकार शनिवारी तालुक्यातील मोटेगाव येथे घडला. या गावातील 35 वर्षीय तरुण राजाभाऊ साळुंके हा तरूण गट नंबर १०० मध्ये वाळू उत्खनन करण्याचे काम करीत असताना वाळू अंगावर पडल्यामुळे दबून मरण पावला. वाळू माफिया कसलीही सुरक्षा न पाहता आणि कोणाच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचे खिसे भरत आहेत. याच प्रकारातून हा बळी गेला .परंतु तालुका दंडाधिकारी असणाऱ्या तहसीलदार लटपटे यांनी वेळीच लक्ष दिले असते तर साळुंके यांचा जीव गेला नसता. त्यांचा संसार उघड्यावर आला नसता. त्यामुळे वाळू सारख्या धंद्यात सुरू असणारे गैरप्रकार जाणीवपूर्वक न थांबवल्या बद्दल तहसीलदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत .या गैरप्रकारांना वेळीच आळा घातला नाही तर असे प्रकार वाढत जाणार आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment