तरुणाची आत्महत्या

Monday, October 8, 2018

लातूर/ प्रतिनिधी.
लातूर शहरातील १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील रामनगर येथे राहत असलेला १८ वर्षीय गोपाळ उध्दवराव सोनवणे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार लक्षात येताच त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

No comments:

Post a Comment