ठाणे : आपल्या मित्र-मैत्रिणींकडे स्मार्ट फोन पाहून तिलाही नवीन मोबाइल घेण्याची इच्छा अनावर झाली होती. त्यामुळे तिने वडील अब्बास यांच्याकडे मोबाइल घेऊन देण्यासाठी तगादा लावला होता, मात्र वडील रिक्षा चालक असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यातच त्यांच्या कमाईतील सर्व पैसा खर्च होतो. त्यातच मुलीने मोबाइल घेऊन देण्याचा तगादा लावला होता. यावर नंतर तुला मोबाइल घेऊन देईन, असे सांगून वडिलांनी तिची समजूत घातली, मात्र आपल्याला मोबाइल मिळणार नाही या नैराश्यातून तिने शुक्रवारी घरात कुणी नसताना पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.अंजुम अब्बास सय्यद (१८) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून, तिने घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली..
Monday, October 8, 2018October 08, 2018
मोबाइल न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
By Marathwada Neta
Monday, October 8, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment