मुंबई :
पेटीएम मॉलच्या विस्तृत कॅटलॉगमध्ये १०० दशलक्षपेक्षा अधिक उत्पादने आहेत जी २०,००० पिन कोडवर डिलिव्हरी केली जातात. मोबाइल, लॅपटॉप्स, मोठी उपकरणे, फॅशन आणि एफएमसीजी श्रेणीतील उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असून 'पेटीएम मॉल महा कॅशबॅक सेल' दरम्यान त्यात अधिक वाढ घडवून आणण्याचा कंपनीचा हेतू आहे.
पेटीएम ई-कॉमर्स लिमिटेडच्या मालकीच्या पेटीएम मॉलने ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान 'महा कॅशबॅक सेल'ची घोषणा केली आहे. कंपनीने आघाडीच्या ब्रँड्सबरोबर भागीदारी केली असून, उत्सवी सेलच्या दरम्यान संयुक्तपणे कॅशबॅक, पेटीएम गोल्ड आणि रोमांचक स्वीपस्टेकवर ५०१ कोटींची गुंतवणूक करणार आहे..
खरेदीदाराचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता या मंचाद्वारे विक्री करण्यात आलेल्या सर्व उत्पादनांवर अधिकृत ब्रँड वारंटी, स्थानिक वितरण आणि विनामूल्य शिपिंगसह या सर्व गोष्टीत येतात. या व्यतिरिक्त, खरेदी सुलभ करण्यासाठी कंपनी मोबाइल, लॅपटॉप्स आणि इतर उपकरणांवर मोठ्या प्रमाणात बँक ऑफर्सद्वारे कोणताही खर्च नसलेला ईएमआय आणि अतिरिक्त १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे..

No comments:
Post a Comment