मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याच्या दैनंदिन मर्यादेमध्ये कपात केली आहे. एसबीआयच्या कार्डद्वारे खातेदारांना आतापर्यंत एटीएममधून दररोज जास्तीत जास्त ४० हजार रुपये काढण्याची मुभा होती. मात्र यापुढे खातेदारांना दिवसभरात केवळ २० हजार रुपये काढता येणार आहेत.
एटीएमच्या माध्यमातून लोकांचे पैसे लुटण्याचे प्रकार वाढल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. डिजिटल व्यवहारांचा चालना देण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे बँकांमध्ये गर्दी वाढण्याची देखील शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना मोठे व्यवहार करण्यासाठी डिजिटल किंवा बँकेत जाऊन पैसे काढावे लागणार आहेत. मागील वर्षभरात एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकेने एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रमाणात घट केली आहे..

No comments:
Post a Comment