मुंबई :
कर्जबाजारी झालेल्या व अस्तित्व पणाला लागलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेसला (आयएल अँड एफएस) उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे शेअर बाजारामध्ये तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सोमवारी २९९ अंकांनी वधारला. दिवसअखेरीस निर्देशांक ३६५२६.१४वर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजारानेही ७७ अंकांची कमाई करत पुन्हा ११ हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीचा निर्देशांक दिवसअखेरीस ११००८वर स्थिरावला.
याउलट स्मॉलकॅप निर्देशांकात मात्र पाव टक्का घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी दिवसभरात व्यवहार झालेल्या एकूण २८५५ कंपन्यांच्या शेअरपैकी १००५ कंपन्यांच्या शेअरचे भाव उसळले, तर १६६४ कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले, तथापि १८६ कंपन्यांच्या शेअरचे भाव अचल राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांपैकी आयटी व टेक्नॉलॉजी निर्देशांकांत सोमवारी अनुक्रमे २.४२ आणि २.०२ टक्के तेजी आली. त्याखालोखाल पॉवर निर्देशांकात २.८३ टक्का, तर पीएसयू निर्देशांकात १.६० टक्का तेजी आली. तसेच मेटल निर्देशांकात १.३३ टक्का, तर बँकेक्स निर्देशांकात एक टक्का तेजी आली. तसेच ऑटो निर्देशांकात पाऊण टक्का, तर एफएमसीजी निर्देशांकात अर्धा टक्का तेजी आली. तसेच हेल्थकेअर निर्देशांकात पाव टक्का तेजी आली. याउलट रियाल्टी निर्देशांकात १.४४ टक्का, तर एनर्जी निर्देशांकात १.३४ टक्का घसरण झाली. तसेच कंझ्युमर ज्युरेबल्स निर्देशांकात ०.७७ टक्का व कॅपिटल गुड्स निर्देशांकात ०.६७ टक्का घसरण झाली. तसेच ऑईल अँड गॅस निर्देशांकात ०.४२ टक्का घसरण झाली..

No comments:
Post a Comment