नवी दिल्ली दि
आज महात्मा गांधी यांची जंयती ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला आणि जय जवान जय किसान'चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीत एल्गार पुकारला. भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली.पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखल्याने, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आधी पाण्याचे फवारे मारले, त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
हजारोंच्या संख्येने आलेल्या या मोर्चेकऱ्यांचं आश्वासन मान्य करण्याऐवजी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्यात काही आंदोलक रक्तबंबाळ झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत वातावरण तापले आहे.
स्वामीनाथन आयोगासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली . मात्र दिल्लीच्या सीमेवरच शेतकऱ्यांना रोखण्यात आलं आहे. दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या दिल्लीच्या पूर्व भागात पोलिसांनी 144 कलम अर्थात जमावबंदीही लागू केली आहे.
संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून उत्तराखंडच्या हरिद्वार येथून किसान क्रांती यात्रा सुरू केली आहे. भारतीय किसान युनियने काढलेल्या या रॅलीत राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडसह देशातील विविध भागातून शेतकरी सहभागी झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हा मोर्चा सुरू आहे. आज हा मोर्चा उत्तर प्रदेशातील गाझीपूर बॉर्डवर रोखण्यात आला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी उडाली आणि हाणामारी सुरू झाली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. दिल्लीत घुसण्यासाठी आक्रमक झालेल्या या शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचा मारा सुरू केला. त्यालाही शेतकरी बधले नाहीत. त्यामुळे अश्रुधूराच्या नळाकांड्या फोडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले.
शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसखोरी करू नये म्हणून गाझीपूर बॉर्डरवर पोलिसांसह आरपीएफच्या जवानांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डवर लावण्यात आलेल्या बॅरिकेडिंगवर ट्रॅक्टर चढवून दिल्लीत कूच करण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी बॅरिकेड उचलून फेकून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसल्याने पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवण्यास सुरुवात केली.


No comments:
Post a Comment