लातुरात हेल्मेटसक्ती नाही पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांचे स्पष्टीकरण

Wednesday, October 17, 2018

लातूर दि
पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांना विश्वासात न घेता शहर वाहतूक शाखेने त्यांच्या नावे परस्पर प्रेस नोट जारी करून दिनांक 16 ऑक्टोबर पासून दुचाकीस्वारासाठी हेल्मेट सक्ती जाहीर केली होती असे उघडकीस आले आहे वारिष्ठांना न कळवता वाहतूक शाखेने शहरातील नागरिकांना हेल्मेटसक्ती वरून वेठीस धरले हा खूप मोठा स्कॅम असल्याची चर्चा आता रंगत आहे कारण पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनीच या बाबत खुलासा करून लातुरात हेल्मेटसक्ती नसल्याचे स्पष्टीकरन पत्रकार परिषदेत दिले आहे


शहरातील दुचाकी स्वरांसाठी शहर वाहतूक शाखेने हेल्मेट सक्ती लागू करून पाचशे रुपयांचा दंड लावणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध स दिले होते या बरोबरच 4 चाकी वाहन चालवताना सीटबेल्ट लावावे या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता प्रसार माध्यमातून हे वृत्त प्रकाशित झाल्या नंतर वाहन धारकात मोठी खळबळ उडाली होती. 

अनेकांनी हेल्मेट खरेदीही सुरू केली आहे मंगळवार पासून हेल्मेटसक्ती लागू होणार असल्याने पोलीस काय कारवाही करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतू 2 दिवसात पोलिसांकडून या बाबत कसलीही कारवाही करण्यात आली नाही त्या मुळे हेल्मेटसक्ती चा फज्जा उडाल्याचे चर्चा सर्वत्र होत असताना या बाबत पत्रकारांनी थेट पोलीस अधिक्षककडे विचारणा केली त्यांनी दिलेले स्पष्टीकरण धक्कादायकच होते हेल्मेटसक्ती बाबत मला कसलीही माहिती नाही मला न कळवताच प्रेस नोट कोणी काढली ? या बाबत आश्चर्य व्यक्त करून पोलिस अधीक्षक लातुरात कसलीही हेल्मेटसक्ती नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिले पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्या खुलाश्या नंतर वाहतूक शाखेने हा सारा प्रपंच कोणाच्या हितासाठी केला ? नागरिकांच्या की व्यावसायिकांच्या या वरून शंका उपस्थित केली जात आहे

No comments:

Post a Comment