धोरण बदलू : अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वातील कारखान्यास पैसा कमी पडू देणार नाही : आ. प्रविण दरेकर

Friday, October 19, 2018

वतनदारी आणू पाहणार्‍यास मोडीत काढू  मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. प्रविण दरेकर


औसा, दि. 19.........
साखर कारखान्याचं खाजगीकरण करण्यासाठी व आपलीच वतनदारी चालवण्यासाठी या निवडणूकीत प्रयत्न करणार्‍यांना धडा शिकवा, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेळप्रसंगी धोरणात बदल करुन अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वातील मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यास पूर्ण आर्थिक मदत करु असे वचन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. प्रविण दरेकर यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत दिले. व्यासपीठावर पॅनलप्रमुख अभिमन्यू पवार, निवडणुकीचे प्रभारी गोविंदअण्णा केंद्रे, आ. सुधाकर भालेराव, रमेशअप्पा कराड, गणेश हाके, भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलतांना प्रविण दरेकर म्हणाले की, अभिमन्यू पवार हे सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्व करत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्रातील प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी व सहकाराचे खाजगीकरण करु पाहणार्‍याला चपराक लावण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गेली 4 वर्षे मारुती महाराज सहकारी साखर कारखाना ज्यांच्यामुळे बंद होता व ज्यांनी सुरु होऊ दिला नाही अशी अभद्र युती समोर आहे. सहकार मोडीत काढू पाहणार्‍यांना व सहकाराचं खाजगीकरण करु पाहणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सर्वांनी अभिमन्यू पवार यांना साथ द्यावी. मी अभिमन्यू पवार यांचं अभिनंदन करतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मतदारांनी या पॅनलला साथ द्यावी.

सहकाराची मक्तेदारी करणार्‍यांपासून सावधान

सहकारी साखर कारखानदारी ही वैयक्तिक समजून, आपली मक्तेदारी समजून सहकारी संस्था बुडवायच्या व खाजगीकरण करुन आपल्या ताब्यात घ्यायच्या या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी सर्वांनी अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वातील पॅनलला साथ द्यावी असंही आ. दरेकर म्हणाले.

अमित देशमुखाच्या  संस्थेला मी कर्ज दिलंय
विकास कारखाना, प्रियदर्शनी कारखाना, ट्वेन्टी वन कारखाना या अमित देशमुख यांच्या नेतृत्वातील साखर कारखान्यास मुंबई जिल्हा बँकेने कर्ज दिलेलं आहे. व अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वातील मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला जेवढे लागतील तेवढे पैसे देण्याचं मी वचन देतो. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक येणार्‍या काळात पाच-दहा साखर कारखान्याचं पुनर्जिवन करण्यासाठी आर्थिक मदत करत आहोत. शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय मुंडेंना मदत केली व याठिकाणी अभिमन्यू पवार या कारखान्याची निवडणूक लढवत आहेत आम्ही त्यांना पूर्ण मदत करुत, विशेष बाब म्हणून सहकार्य करुत हे सांगण्यासाठी मी आलो आहे, असंही यावेळी आ. प्रविण दरेकर म्हणाले. ज्याठिकाणी प्रस्थापिताविरोधात जो कोणी उभा राहतो त्याठिकाणी जनता ही निवडणूक लढवत असते. अभिमन्यू पवार यांच्या रुपाने या भागातील समर्थ नेतृत्व या पॅनलला लाभलंय, असं सांगून जनता चमत्कार घडवणार असा विश्‍वास आ. दरेकर यांनी व्यक्त केला.

पवार गाडी चालवत होते
पत्रकार परिषद झाल्यानंतर लोदगा गावाकडे स्वतः ड्रायव्हींग अभिमन्यू पवार करत होते. बाजूला रमेश कराड होते तर त्यांच्यासोबत आ. सुधाकर भालेराव, गणेश हाके, गोविंद केंद्रे व पाशा पटेल हे होते. एकंदरीत जबरदस्त टीमवर्क व लोकांचा प्रतिसाद केटली चिन्हास मिळत आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment